नशेच्या इंजेक्शनाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

नशेच्या इंजेक्शनाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) - नशेच्या इंजेक्शनाची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. तेजस उदयकुमार महाजन वय 35, रा.  कोल्हापूर व विवेक शिवाजी पाटील वय 30, रा. माळीवाडी, उचगांव अशी अटक केलेल्यांची नावे असून या दोघांकडून MEPHENTERMINE SULPHATE या कंपनीच्या नशिल्या इंजेक्शनच्या 75 बाटल्या, गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल असा एकूण 1,74,150/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, शाहुपूरीतून जाणाऱ्या रोडवर एक इसम त्याच्याकडील मोटारसायकलीवरून MEPHENTERMINE SULPHATE इंजेक्शन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून तेजस महाजन व विवेक पाटील या दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपास शाहुपुरी पोलीस करीत आहेत. 

या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, राजू कोरे, प्रदिप पाटील, विलास किरोळकर, शुभम संकपाळ, लखन पाटील, संतोष बरगे, विशाल खराडे, गजानन गुरव, सुशील पाटील, सागर चौगले यांच्यासह आदी पोलीसांनी कारवाईत सहभाग घेतला होता.