उचगांव येथे महाशिवरात्र निमित्त आरोग्य तपासणी शिबीर

उचगांव येथे महाशिवरात्र निमित्त आरोग्य तपासणी शिबीर

उचगाव (प्रतिनिधी) : महाशिवरात्री निमित्त श्री ब्रम्हनाथ देवालय जीर्णोद्धार समिती उंचगाव यांच्यामार्फत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले.

जानकी हाॅस्पिटल मार्फत विविध आजारावर मोफत आरोग्याची तपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात आली.डाॅ गीता पिल्लई स्त्रीरोग यांच्या हॉस्पिटलच्या टिम मार्फत शिबिरात आलेल्या व्यक्तींची तपासणी करून माहिती देण्यात आली. यावेळी महाशिवरात्रीनिमित्त उचगांव गावचे ग्रामदैवत श्री मंगेश्वर मंदिर याची पालखी मंदिरामध्ये आणुन आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाला सुरवात करण्यात आली. नुतून जिल्हा परिषद सदस्य नामदेव वांईगडे उचगाव पंचायत समिती सदस्य तानाजी कांबळे गांधीनगर पंचायत समिती सदस्य संगीता यादव

श्री ब्रम्हनाथ देवालय जीर्णोद्धार समिती अध्यक्ष संतोष पाटील, पांडुरंग घुणके,सुहास पाटील, ब्रम्हनाथ तरूण मंडळाचे अध्यक्ष, ओंकार लोळगे,उपाध्यक्ष विनायक नाईक,सुरज पाटील,सतीश मर्दाने,

 सागर जंगम, करण यादव ,उदय पाटील ,दशरथ चौगुले,संजय चौगुले,नितीन कदम मंडळातील सर्व सभासद, ग्रामस्थ,भाविक उपस्थित होते.