उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार निशाणा साधत राजू शेट्टी म्हणाले,...
नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनात सी. पी. राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदासाठी शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी एनडीएतील घटक पक्षांचे नेते आमंत्रित करण्यात आले आहेत. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार या समारंभाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार निशाणा साधला.

नवी दिल्लीत आज माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःच अनेक उचापती करतात, त्यामुळेच त्यांना अज्ञातवासात जावं लागतंय. ऊस दराशी थेट संबंध नसताना ते कमिटीचे अध्यक्ष बनतात. प्रशासनाचा गैरवापर करून निर्णय घेतात आणि त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील असा टोलाही त्यांनी लगावला.




