ओबीसी समाजावर संकट आलं तर...; मंत्री छगन भुजबळ

ओबीसी समाजावर संकट आलं तर...; मंत्री छगन भुजबळ

मुंबई - ओबीसी (मागासवर्गीय) समाजावर संकट आलं, तर आपण सर्वांनी एकत्र यायला हवं, असं प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. एखादा समजदार असेल, तर त्याच्याशी लढणं शक्य आहे. पण ज्याला काहीच कळत नाही, त्याच्याबद्दल काय बोलणार? अशा मिश्कील शब्दात मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटीलांना टोला लगावला. 

यावेळी मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांची नक्कलही केली आणि कोणी काळजी करू नका, आपण लढणार आहोत आणि जिंकणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जर जरांगे असं म्हणत असतील की ओबीसीच्या उमेदवारांना पाडा, तर आम्ही काय म्हणायचं? जर त्यांनी अशी भूमिका घेतली, तर आम्हालाही पक्ष बाजूला ठेवून लढावं लागेल, असंही मंत्री भुजबळ म्हणाले.

मंत्री भुजबळ पुढे म्हणाले, जर त्यांचं बोलणं असंच सुरू राहिलं, तर आम्हालाही ओबीसी समाजाला एकत्र येऊन लढण्याचं आवाहन करावं लागेल. ही रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे.