कोल्हापूरात सर्किट बेंच सुरु झाल्याबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने श्री अंबाबाई देवीस अभिषेक

कोल्हापूरात सर्किट बेंच सुरु झाल्याबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने श्री अंबाबाई देवीस अभिषेक

कोल्हापूर (प्रतिनिधी) - मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरु होऊन कालपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकील, पक्षकार, राजकीय पदाधिकारी, विविध संघटना यांच्या एकत्रित ४२ वर्षाच्या लढ्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे यश आले आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सकारात्मक दृष्टीकोन व गतीमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम भूमिकेमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे खंडपीठासाठी आवश्यक असणारी कोल्हापूर शेंडापार्क येथील जमीन दोनच दिवसांत खंडपीठाच्या नावावर हस्तांतरित करण्यात येणार असून यामुळे लवकरच भविष्यात कोल्हापूरात खंडपीठ होण्याचा मार्ग सुकर बनला आहे. या निर्णयामुळे सहा जिल्ह्यातील वकील, पक्षकार यांना फायदा होणार असून त्याचे वेळ, पैसा, श्रम यांची बचत होणार आहे. जिल्ह्यासाठीच्या या महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णयाबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम. चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसहित आई अंबाबाई मंदिर या ठिकाणी देवीस अभिषेक करण्यात आला व त्यानंतर भाविकांना प्रसाद वितरीत करण्यात आला. 

 

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी कोल्हापूर सर्किट बेंच पूर्ततेसाठी सकारात्मक भूमिका घेऊन ती पूर्णत्वास नेणारे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मनस्वी अभिनंदन केले. सर्किट बेंच कोल्हापुरात सुरु होण्याचा निर्णय म्हणजे कोल्हापूरच्या विकासासाठी पुढेचे पाउल ठरणारा आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होऊन कोल्हापूरचे अर्थकारण बदलणार आहे. त्याचबरोबर या ऐतिहासिक निर्ण्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाम.चंद्रकांत पाटील यांचे देखील याप्रसंगी अभिनंदन करण्यात आले. 

यावेळी अमर साठे, विराज चिखलीकर, धनश्री तोडकर, राजू मोरे, हेमंत आराध्ये, अशोक देसाई, गणेश देसाई, माधुरी नकाते, किरण नकाते, विजय अग्रवाल, अजित सूर्यवंशी, राजसिंह शेळके, सयाजी आळवेकर, दिलीप बोंद्रे, सचिन कुलकर्णी, दिलीप मेत्राणी, विशाल शिराळकर, सचिन पोवार, अप्पा लाड, सागर रांगोळे, रविकिरण गवळी, सुनील पाटील, अॅड.तांबे, अॅड.कदम, विश्वजित पोवार, बंकट सूर्यवंशी, संजय जासूद, महेश यादव, संतोष माळी, प्रणोती पाटील, अनिकेत अतिग्रे, स्वाती कदम, कोमल देसाई, छाया साळुंखे, सुरेश गुजर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.