गणेशोत्सवादरम्यान पुण्याहून कोकणसाठी धावणार 'इतक्या' रेल्वे

पुणे - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे रेल्वे विभागाकडून १२ विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुण्यातून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या काळात पुण्यात राहणारे कोकणवासी आपल्या गावी परततात. ही गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे आरक्षण गुरुवार, २४ जुलैपासून सुरू होणार आहे.
पुणे - रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाड्या (६ फेऱ्या) :
- गाडी क्रमांक 01447 :
पुणे येथून २३, ३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी शनिवारच्या दिवशी रात्री १२:२५ ला सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११:५० ला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01488 :
रत्नागिरी येथून २३, ३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी शनिवारच्या दिवशी दुपारी ५:५० ला सुटेल आणि पुण्यात दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचेल.
पुणे - रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या (६ फेऱ्या) :
- गाडी क्रमांक 01445 :
मंगळवार, २६ ऑगस्ट तसेच २ व ९ सप्टेंबर रोजी पुणे येथून रात्री १२:२५ ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:५० ला रत्नागिरी येथे पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01446 :
रत्नागिरी येथून २६ ऑगस्ट, २ व ९ सप्टेंबर रोजी मंगळवारी दुपारी ५:५० ला सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचेल.
या गाड्यांचे थांबे पुढील स्थानकांवर असतील :
चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड.
मध्य रेल्वेची घोषणा :
मध्य रेल्वेने मुंबई व पुणे येथून कोकणासाठी २५० गणपती विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. हे विशेष गाड्या १० मार्गांवर धावणार असून, त्यांचे आरक्षण २४ जुलैपासून सुरू झाले आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES मोबाईल अॅप डाउनलोड करावे.
मुंबईहून सुटणाऱ्या गाड्या CSMT आणि LTT येथून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगावसाठी सुटतील. पुण्याहून देखील रत्नागिरीकडे गाड्या धावतील.