२० वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा ; कोल्हापूर परिक्षेत्रीय संघाचा दमदार झेंडा

२० वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा ; कोल्हापूर परिक्षेत्रीय संघाचा दमदार झेंडा

पुणे - पुणे येथे १४ ते १९ सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या २० व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात कोल्हापूर परिक्षेत्रीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत ७ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्य पदके मिळवत सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने आयोजित या मेळाव्यात राज्यातील २६ संघांनी सहभाग घेतला होता. गुन्हे तपास, फॉरेन्सिक, घातपातविरोधी तपासणी, श्वान स्पर्धा, पोलीस फोटोग्राफी व कॉम्प्युटर अवेअरनेस अशा विविध स्पर्धांत पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.

कोल्हापूर परिक्षेत्रीय संघात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण जिल्ह्यांतील पोलीस दलांचा समावेश होता. या संघातील अन्वर मुजावर, रघुनाथ शिंदे, संदीप पांडव, अमोल गवळी, निखील जाधव, प्रसाद मांढरे, अजय सावंत, दत्तात्रय चव्हाण व सचिन भोसले यांनी विविध प्रकारांत पदके मिळवली.

विशेष कामगिरी :

कॉम्प्युटर अवेअरनेसमध्ये ३ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदके मिळवून

विनर ट्रॉफी - 

पोलीस फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीमध्ये फोटोग्राफी विनर ट्रॉफी

या यशासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस यांचे मार्गदर्शन लाभले.कोल्हापूर परिक्षेत्रीय संघातील विजेत्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

येत्या नोव्हेंबरमध्ये नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा - २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य यजमान असणार आहे.