गाड्या, पैसा आणि जवळचे मित्र; राजकारणातील वास्तवावर अमित ठाकरेंची टीका

गाड्या, पैसा आणि जवळचे मित्र; राजकारणातील वास्तवावर अमित ठाकरेंची टीका

मुंबई (प्रतिनिधी) : राजकारणाचा जो चिखल झालेला आहे त्याकडे मी आता लोकांना पहायला सांगीन, राजकिय नेते जो उमेदवार देत आहेत, तो जिंकेलचं हा जो आत्मविश्वास त्यांच्यात आला आहे तो लोकांनी तोडून काढायला पाहिजे. ज्याच्याकडे गाड्या आहेत, पैसे आहेत, जो माझा मित्र आहे, त्याला उमेदवारी देत आहेत. हा आत्मविश्वास लोकांनी तोडून काढला पाहिजे. जनतेमुळे ते तिथे बसलेत, हे दाखवून द्यायला हवे. या लोकांना जास्त माज दाखवू नये. लोकांनी मुभा दिल्याने हे करत आहेत. पालिकेत काय झालं? 5 ते 6 कोटी देवून उमेदवार निवडून आणले. आपण कधी जागे होणार आहोत? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) युवानेते अमित ठाकरे यांनी सध्याचा राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. 

दरम्यान, ज्या दिवशी लोकं जागे होतील त्या दिवशी सरकारला धाक बसेल. लोकं कधी जागे होणार याची आम्हाही वाट बघतोय. कॉक्रोच जनता पार्टीबाबत पक्षाची भूमिका राज ठाकरे मांडतील. मात्र वैयक्तिक मी सांगीन तर ते जर आंदोलन करतील तर मला आनंद आहे. त्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, असे माझं मत असल्याचं अमित ठाकरेंनी व्यक्त करत काॅकरज जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. जागतिक पर्यावरण दिना निमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेत ते सहभागी झाले होते. यावेळी मुंबईचा किंवा राज्याचा विकास पर्यावर्णाचा व्ह्यास करून होणार असेही मत व्यक्त केले तर नाशिकची वृक्ष तोड ही ती जागा कोणाच्या तरी घशात घालण्यासाठी होत असल्याची टीकाही त्यांनी सत्ताधार्यावर केली.