तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे संशोधक प्रा. महेश गावडे यांना पीएच.डी. प्रदान

तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे संशोधक प्रा. महेश गावडे यांना पीएच.डी. प्रदान

कोल्हापूर/प्रतिनिधी : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी तंत्र विद्यापीठाच्या 'स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग'चे संशोधक प्रा. महेश वासुदेव गावडे यांना विद्यापीठाकडून नुकतीच पीएच.डी. (Ph.D.) पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी संगणक विज्ञान क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावर आपले संशोधन यशस्वीरी्या पूर्ण केले.

प्रा. गावडे यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर प्रायसिंग इन -कॉमर्स विथ रिस्पेक्ट टू मार्केट ट्रेण्ड्स' (Artificial Intelligence for Pricing in E-Commerce with respect to Market Trends) या विषयावर हा शोधप्रबंध सादर केला. आजच्या गतिमान डिजिटल युगात -कॉमर्स क्षेत्रातील वस्तूंची किंमत ठरवताना बाजारातील चढ-उतारांचा (ट्रेंड्स) अभ्यास करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा केला जाऊ शकतो, यावर त्यांनी या संशोधनात प्रकाश टाकला आहे.

प्रा. महेश गावडे यांनी हे संशोधन डी. वाय. पाटील कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. जयदीप पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.

या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. . के. गुप्ता आणि कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी प्रा. गावडे यांचे विशेष कौतुक केले.

तसेच या संशोधन कार्यात विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील आणि डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. एस. आर. पावसकर यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले. प्रा. महेश गावडे यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.