बिहारच्या निकालानंतर संजय राऊतांनी साधला केंद्र सरकारवर निशाणा
मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूच्या नेतृत्वाखाली एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला. या निवडणुकीत ६७.१३ टक्के मतदान झाले, ज्यात महिलांच्या सहभागाने निर्णायक भूमिका बजावली. बिहार निकालानंतर महाराष्ट्र शिवसेना (उबाठा) खा. संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, “लोकशाही १०,००० रुपयांना विकली जाते, हे बिहारमध्ये स्पष्ट झाले” असा आरोप केला. त्यांनी पुढे म्हटले की, “निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या हातात हात घालून राष्ट्रीय स्तरावर जे काम चालू होते, ते पाहता वेगळा निकाल येणे शक्य नव्हते. एकदम महाराष्ट्र पॅटर्न! मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत अंदाजे १.५ कोटी महिलांच्या बँक खात्यात थेट १०,००० रुपये जमा केले गेले होते. योजनेमुळे निवडणुकीपूर्वी महिलांना आर्थिक मदत मिळाली, परंतु राऊतांच्या मते, याचा उपयोग मत मागवण्यासाठी केला गेला.
या व्यतिरिक्त, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) च्या चिराग पासवान यांनी निवडणुकीत आपली ताकद सिद्ध केली. त्यांनी लढवलेल्या २९ जागांपैकी १८ जागा जिंकल्या आणि एका जागेवर आघाडी मिळवली. २०२० मध्ये एलजेपीने फक्त एक जागा जिंकली होती.
विपक्षी पक्षांमध्ये काँग्रेसची कामगिरी सर्वात निराशाजनक ठरली; ६१ जागांवर उमेदवार उभे करूनही फक्त ६ जागा मिळाल्या. त्याचबरोबर एआयएमआयएम आणि एचएएम प्रत्येकी ५-५ जागा जिंकू शकले. इतर लहान पक्षांनी काही जागा जिंकल्या, परंतु निकालावर त्यांचा ठसा नाहीसा ठरला.




