महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस गेला - खा. धनंजय महाडिक

महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस गेला - खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गेल्या तीन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात अग्रेसर असलेल्या दादा माणसाला आज आपण गमावले आहे. दूरदृष्टी, प्रशासनावर पकड, निर्भीड आणि स्पष्टवक्ता स्वभाव, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. चांद्या पासून बांद्या पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांना ते नावानिशी हाक मारायचे. इतकी त्यांची कार्यकर्त्यांविषयी आपुलकी आणि माहिती असायची. त्यांचा कामाचा आवाका तर प्रचंड होता. भल्या पहाटेपासून त्यांचा दिवस सुरू व्हायचा तो रात्री उशिरापर्यंत येणाऱ्या प्रत्येक फाईल बाबत किंवा कार्यकर्त्यांच्या कामांच्या पूर्ततेसाठी ते अभ्यासपूर्ण भूमिका मांडून काम पूर्ण करण्यासाठी आग्रही असायचे अशी भावना खा. धनंंजय महाडिक यांनी व्यक्त केली. 

खा. धनंजय महाडिक पुढे म्हणाले, अजितदादांची अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. महाराष्ट्राचा राजकीय आणि सामाजिक इतिहास अजितदादांशिवाय पुरा होऊ शकत नाही. त्यांच्या निधनामुळे कधीही भरून न येणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. पवार कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..