आमचा "दादा" गेला.......! - ना. हसन मुश्रीफ
कोल्हापूर (प्रतिनिधी) - ना. अजितदादा पवार हे नावाप्रमाणेच आम्हा सर्वांचे खऱ्या अर्थाने "दादा" होते. एक मित्र, एक भाऊ, एक नेता अशा विविध रूपांमध्ये आम्ही सर्वांनीच त्यांना अनुभवले आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र एका चांगल्या प्रशासकाला, जनतेविषयी प्रचंड आस्था आणि तळमळ असलेल्या एका दूरदृष्टी असणाऱ्या प्रगल्भ नेत्याला कायमचा मुकला आहे. आमचा दादा आम्हाला पोरकं करून गेला. सबंध महाराष्ट्रावर हा आघातच इतका प्रचंड आहे की, या दुःखातून आमच्यासारखे कार्यकर्ते सावरुच शकत नाहीत अशी भावना ना. हसन मुश्रीफांनी व्यक्त केली.




