महावीर जयंती निमित्त उद्या असेल अशी वाहतूक व्यवस्था

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शहरात उद्या १००८ भगवान महावीर जयंती उत्सव समिती इचलकरंजी व समस्त जैन बांधव यांच्या वतीने नांदणी येथील हत्ती वनतारा जामनगर येथे घेवून गेल्याच्या निषेधार्थ निशीधिका नांदणी येथून पदयात्रा सुरवात करुन ती सांगली कोल्हापूर हायवे ने शिरोली फाटा येथून पुणे-बेंगलोर या महामार्गावरुन तावडे हॉटेल येथे येवून तेथून ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर, बंसतबहार टॉकीज ते जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर या मार्गावरुन निघणार आहे.
या मार्गावरील पदयात्रा मधील नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरीकांची व वाहनधारकांची गैरसोय होवू नये, वाहतूकीची कोंडी होवू नये, सामान्य जनतेस आपले नेहमीचे व्यवहार पारपाडणेकामी अडचण निर्माण होवू नये या करीता तावडे हॉटेल ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील वाहतूक खालील प्रमाणे तात्पुरती बंद व पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे. याकरीता सदर परिसरात खालील प्रमाणे रहदारी नियमन करणे आवश्यक असल्याने अप्पर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी खालील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत.
अ) आवश्यकते नुसार एकेरी वाहतुकीचा मार्ग :-
१. पदयात्रा तावडे हॉटेल ते ताराराणी पुतळा ते वाभोळकर कॉर्नर ते असेंब्ली कॉर्नर या मार्गावर पदयात्रा सुरु असताना तावडे हॉटेल ते असेब्ली कॉर्नर दरम्यान प्रवास करणारी सर्व वाहने आवश्यकते नुसार एकेरी मार्गावरुन मार्गस्थ होतील,
ब) पदयात्रा मार्गावर शिथिल करण्यात येणारा वन वे मार्ग :-
२. रॅली मार्गावर येणा-या महालक्ष्मी चेंबर्स ते बटेश्वर मंदिर हा वन-वे मार्ग सर्व वाहनाकरीता रैली मार्गक्रमण मुदती करीता शिथील करणेत येत आहे.
क) पदयात्रा मार्गावर आवश्यकतेनुसार बंद-सुरु करणेत आलेले व वळविण्यात आलेले मार्ग -
०१ पदयात्रा तावडे हॉटेल या ठिकाणी आले नंतर पुणे बेंगलोर हायवेवरुन सर्व्हिस रोड ने तनवाणी कॉर्नर येथे उतरुन तावडे हॉटेल मार्गे शहरात येणारी सर्व वाहतुक ही तावडे हॉटेल ब्रिज पासुन पुढे उंचगांव ते उजळाईवाडी या दिशेने वळविण्यात येईल. कोल्हापुर शहरामध्ये येणारी वाहतुक ही शाहु टोल नाका ते केएसबीपी चौक ते सायबर चौक या मार्गे कोल्हापूरात प्रवेश करतील,
०२ पदयात्रा सुरु झाले नंतर पदयात्रा मार्गावर येणारे वाळू अड्डा, मार्केट यार्ड चौक, जोतीबा हॉटेल चौक, मुक्त सैनिक, लिशा हॉटेल सिंग्नल, ताराराणी चौक या सर्व चौकामध्ये येणारी सर्व वाहतूक पदयात्रा मार्गक्रमण होत असताना मार्केट यार्ड ते स्टार बाझार (रेल्वे लाईनचे बाजूने) या पर्यायी मार्गान वळविण्यात येईल.
०३ पदयात्रा सुरु झाले नंतर पदयात्रा ताराराणी चौक, पंचशील हॉटेल, दाभोळकर कॉर्नर, रेल्वे इन व आऊट गेट, गोकुळ हॉटेल, मलबार चौक, असेब्ली चौक या सर्व चौकामध्ये येणारी सर्व वाहतूक पदयात्रा मार्गक्रमण होत असताना पर्यायी मार्गाचा वापर करतील.
०४ पदयात्रा ताराराणी चौकात आलेनंतर धैर्यप्रसाद चौकाकडून ताराराणी चौकाकडे येणारी सर्व वाहतूक निंबाळकर चौक, (सदरबाजार चौक) येथे आवश्यकते नुसार बंद करण्यात येत आहे. सदरची वाहतूक उजवीकडे अगर डावीकडे वळून मार्गस्थ होईल.
०५ ताराराणी चौकातून पदयात्रा पुढे पंचशील हॉटेल चौक, दाभोळकर सिग्नल, मलबार हॉटेल चौक, असेंब्ली कॉर्नर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचूपर्यंत ताराराणी चौकातून स्टेशन रोडकडे जाणारी वाहतूक ही धैर्यप्रसाद चौक, पितळी गणपती चौक, पोस्टे ऑफीस चौक, महावीर कॉलेज चौक, खानविलकर पेट्रोल पंप, सीपीआर हॉस्पीटल चौक मार्गे पुढे मार्गस्थ होईल,
०६ पदयात्रा असेब्ली कॉर्नर येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होत असताना सीपीआर हॉस्पीटल चौकाकडून ताराराणी चौकाकडे जाणारी वाहतूक ही खानविलकर पेट्रोलपंप, महावीर कॉलेज, पोस्ट ऑफीस, पितळी गणपती चौक, धैर्यप्रसाद चौक, ताराराणी चौक या पर्यायी मार्गाचा वापर करतील.
वरील निर्देश हे उद्या पदयात्रा सुरु होऊन संपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुक सुरु-बंद करणे व वळविणेत येत आहे. याशिवाय शहरातील इतर रस्ते, चौक याठिकाणची वाहतुक आवश्यकतेनुसार सुरु-बंद करणे अगर वळविण्यात येत आहे. (शासकीय, आपत्कालिन वाहने वगळून).