'या' उपक्रमामुळे कोल्हापूर ज्वेलरी उद्योगाला राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पोहोचण्याचा मार्ग सुलभ - नचिकेत भुर्के

कोल्हापूर - आज कोल्हापूरच्या दागिन्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. कारागीर वर्गासाठी खास करून सोनारांसाठी PM विश्वकर्मा योजनेच्या नोंदणी प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली, ही योजना त्यांच्या आर्थिक व तांत्रिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणार असून या उपक्रमामुळे कोल्हापूर ज्वेलरी उद्योगाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्याचा मार्ग अधिक सुलभ होईल, असे प्रतिपादन नचिकेत भुर्के यांनी केले.
त्याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्वेलर्स, कारागीर, मॅन्युफॅक्चरर्स, होलसेलर्स आणि एक्सपोर्टर्स यांच्यासाठी एक मोठा प्रकल्प कोल्हापुरात आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असता या बैठकीत या प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
मुंबईतील शिष्टमंडळाने कोल्हापुरातील ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर्सना मेगा CFC या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा फायदा घ्यावा, असे आवाहन नचिकेत भुर्के यांनी केले. या CFC प्रकल्पामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे अधिक दर्जेदार व आकर्षक दागिने तयार करता येतात, तसेच उत्पादन क्षमता देखील वाढवता येते. याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देखील दिली अशाच प्रकारचे CFC सेंटर कोल्हापुरात करण्यासाठी सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन महाराष्ट्र राज्य ने शिष्टमंडळाकडे नचिकेत भुर्के यांनी मागणी केली.
ही बैठक ज्वेलरी कौन्सिलचे नॅशनल पदाधिकारी, शिष्टमंडळ व सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी असोसिएशन उपाध्यक्ष प्रकाश घाटगे, सेक्रेटरी गोपीनाथ नार्वेकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय म्हसवेकर, संचालक सागर नलवडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.