शरद फार्मसी कॉलेजला मान्यता या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरु
यड्राव (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव येथील शरद कॉलेज ऑफ फार्मसी ह्या बी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक दृष्टिने महत्त्वाची भर पडली असून फार्मसी क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी दिशा उपलब्ध झाली आहे. या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरु होत आहेत.

महाविद्यालयाला एकूण ६० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची परवानगी मिळाली असून यामध्ये ओपनसह इतर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र राहणार आहेत. राज्याच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राऊंडमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांना सर्व शासकीय शिष्यवृत्तींचा लाभ मिळणार आहे. महाविद्यालयात सन २०२३-३४ पासून डि फार्मसी (पदविका) सुरु आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तावर्धित अध्यापन पद्धती, आधुनिक पायाभूत सुविधा, सर्व सुविधांनी सुसज्ज आधुनिक लॅब, प्रयोगशील शिक्षण पद्धतीस चालना देणारी उपकरणे व तांत्रिक सहाय्यक कर्मचारी आणि महाविद्यालयाचा “शरद पॅटर्न” म्हणून ओळखला जाणारा प्रगत शिक्षण पद्धतीचा अवलंब हे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे. महाविद्यालयामध्ये अनुभवी शिक्षक असून आधुनिक शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांना ‘थिअरीसह प्रॅक्टिकल’चा सर्वांगीण अभ्यास देणार आहे. संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी सर्व स्टाफचे अभिनंदन केले.
राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगत, नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापनपद्धतीचा अवलंब करणारा म्हणून ‘शरद पॅटर्न’ला आज वेगळीच ओळख मिळाली आहे. तांत्रिक शिक्षणात उत्कृष्टता साधल्यानंतर आता फार्मसी अभ्यासक्रमाची भर शरद समूहात पडत आहे. शरद परिवाराच्या एकजुटीचा, सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि कार्यरत असलेल्या सर्व स्टाफच्या समर्पित परिश्रमांचा परिणाम आहे. शिक्षण क्षेत्रात नवे मानदंड निर्माण केले आहे.




