राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथे मराठा सेवा संघातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा सेवा संघ, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील विविध वाड्या-वस्त्यांवर शालेय शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येते. याच सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत आज, शनिवार दिनांक ११ जुलै २०२६ रोजी, राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि वह्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अश्विनकुमार वागळे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप पाटील, जिल्हा संघटक सुशांत निकम आणि जिल्हा उपाध्यक्ष तानाजी हातकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला बारडवाडीचे सरपंच वसंत बारड, तांत्रिक कामगार पतसंस्थेचे चेअरमन अमर फराकटे, केंद्र शाळा ठीकपूर्लीचे शिक्षक संतोष पाटील, तसेच सागर शिंदे आणि शुभम पाटील यांच्यासह बारडवाडी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व सेवा संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




