साईनाथ मल्टीस्टेटचे संस्थापक उत्तम जाधव यांना 'महाराष्ट्राचे अनमोल रत्न' पुरस्कार

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते साईनाथ मल्टिस्टेट ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष उत्तम आनंदराव जाधव यांना मानाच्या 'महाराष्ट्राचे अनमोल रत्न' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उत्तम जाधव यांचे शिक्षण बी. ई. मेकॅनिकल झाले आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात, युवकांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी साईनाथ मल्टिटेस्ट को-को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली. कोरोनानंतर चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते गावी आले.
उत्तम जाधव यांनी या अर्थ संस्थेतर्फे अर्थसहाय्य करून नवीन उद्योजकांना मदतीचा हात दिला . राधानगरी अर्बन फाऊंडेशन व लोकमान्य करिअर अॅकॅडमी जुनिअर कॉलेजच्या माध्यमातून ते शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवत आहेत. त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला.