कामगार संहिता विरोधी कागलमध्ये सिटुच्या वतीने निदर्शने
कागल (प्रतिनिधी) - केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचे 29 कायदे रद्द करून कामगार विरोधी व मालक दर्जेने चार सहिता आणलेले आहेत या चार संहितांना विरोध करण्यासाठी आज केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने देशभर निदर्शने करण्यात आली त्याचाच एक भाग म्हणून सिटीच्या वतीने कागल तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली यामध्ये मोठ्या प्रमाणात आशा, गटप्रवर्तक, बांधकाम कामगार, व ऊस तोडणी कामगार उपस्थित होते. या देशव्यापी आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांना देण्यात आले.

यावेळी बोलताना सिटुचे जनरल सेक्रेटरी कॉ. शिवाजी मगदूम म्हणाले, केंद्र सरकारने लागु केलेल्या चार कामगार संहितामुळे कामगार देशोधडीला लागेल अशी भिती व्यक्त करत या संहिता कामगारांना न्याय देणाऱ्या नसुन मालकांना संरक्षण देणाऱ्या असल्याची जोरदार टीका केली..
मगदूम पुढे म्हणाले, नवीन चार कामगार संहितां लागु केल्यास कामाचे तास ८ तासावरून १२ तास करण्यासंबंधीची तरतूद आहे.यामुळे कामगारांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडेल आणि त्यांना कौटुंबिक व सामाजिक जीवनासाठी वेळ मिळणार नाही. ८ तासांचा कामाचा दिवस हा अनेक दशकांच्या संघर्षातून मिळालेला हक्क आहे, आणि तो हिरावून घेतला जाणार आहे असा आरोपही सिटुचे जिल्हा कॉ. शिवाजी मगदूम यांनी केला.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नवीन संहितेमुळे कंत्राटी कामगार पद्धतीला प्रोत्साहन मिळेल, कायमस्वरूपी नोकऱ्या कमी होतील. तसेच कामगारांना केवळ राबवून घेतले जाईल आणि त्यांचे हक्क व सुविधा रद्द होतील.
नवीन कायद्यांमध्ये कामगारांना संघटित होण्याचा आणि न्याय्य हक्कांसाठी संघटना स्थापन करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे त्यामुळे कामगारांना न्याय मागण्यासाठी संघटना करता येणार नाही.
हे कायदे भांडवलशाहीचे आणि मालकांचे समर्थन करणारे आहेत. यापुर्वी च्या कायद्याने २० कामगारांपर्यंतच्या आस्थापनांसाठी कामगारांना दाद मागता येत होती. परंतु नवीन कायद्यानुसार अनेक छोटे उद्योग कायद्याच्या कक्षेबाहेर राहतील आणि कामगारांना संरक्षण मिळणार नाही.
नवीन कायदे हे कामगारविरोधी असून, यामुळे कामगारांचे मूलभूत हक्क, नोकरीची सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल.त्यामुळे या चार श्रमसंहिता तात्काळ मागे घ्याव्यात व जुने २९ कायदेच पूर्ववत करावे अन्यथा देशभर सर्व राष्ट्रीय कामगार संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी सिटुचे कॉ. विक्रम खतकर, कॉ. मनिषा पाटील, कॉ. आनंदा डाफळे, कॉ. संगीता कामते, कॉ. आरती लुगडे, राजाराम आरडे, कॉ. दिनकर जाधव, कॉ. यल्लाप्पा पाटील, कॉ. राजश्री खिरूगडे, कॉ. साताप्पा पाटील, कॉ. के वाय जाधव, कॉ. अजंम मकुबाळे, कॉ. विनोद वड्ड, कॉ. राणी मगदूम, कॉ. पद्मा भारमल, कॉ. सुवर्णा लोहार, कॉ. गीता करडे, कॉ. माया काशिद यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




