‘केआयटी’ च्या ऋषीराज बुधले ची ‘टेस्ला’ कंपनी मध्ये निवड

‘केआयटी’ च्या ऋषीराज बुधले ची ‘टेस्ला’ कंपनी मध्ये निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) - केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी ऋषिराज दिनेश बुधले यांची जगविख्यात अशा ‘टेस्ला’ कंपनीमध्ये निवड झाली आहे. केआयटी येथून मेकॅनिकल विभागातील पदवी प्राप्त केली. महाविद्यालयात असणाऱ्या वॉक विथ द वर्ल्ड या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठामधून कार्यरत असणारा ऋषिराज उपक्रमांचे आयोजन करणे, नेतृत्व करणे, निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे अशा गोष्टीतून स्वत:ला  विकसित करत होता. तो सध्या ‘टेस्ला’ च्या गिगा फॅक्टरी, टेक्सास येथे प्रशिक्षणासाठी रुजू झालेला आहे. 

कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योगपती दिनेश बुधले यांचा ऋषिराज हा मुलगा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रमानांकित अशा टेस्ला कंपनीत निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाने त्याचे कौतुक केले आहे. “ केआयटी मध्ये विविध ई-सेल सारख्या अन्य विविध विद्यार्थी व्यासपीठाच्या माध्यमातून  उद्योजकतेसाठी आवश्यक अशा गुणांची पेरणी केली जाते ” असे भाष्य  संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले. मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. उदय भापकर संस्थेचे, अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.