कोल्हापूर महापालिका निवडणूक : काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज वितरणास सुरुवात

कोल्हापूर महापालिका निवडणूक : काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज वितरणास सुरुवात

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राज्यातील महानगरपालिका निवडणुका समीप आल्या असून कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी देखील वेगाने सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज वितरणाची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

उमेदवारी अर्ज घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. सतेज डी. पाटील आणि शहराध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

उमेदवारी मागणीचे अर्ज २ डिसेंबर २०२५ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. तसेच, १३ डिसेंबर २०२५ पासून भरलेल्या अर्जांची इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.