गुलाबी टी-शर्टमधील अशोक खरात कोर्टात स्तब्ध; न्यायाधीशांच्या प्रश्नावर भोंदूची मान हलली

गुलाबी टी-शर्टमधील अशोक खरात कोर्टात स्तब्ध; न्यायाधीशांच्या प्रश्नावर भोंदूची मान हलली

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरातला आज राहाता सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.  जमीन खरेदी व अवैध सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, RCP च्या तुकडीसह मोठ्या पोलिस बंदोबस्तात खरातला  न्यायालयात हजर करण्यात आलं. राहाता न्यायालयात  सरकारी वकील ॲड.गौरव बोर्डे यांच्याकडून युक्तिवाद करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. आरोपींनी कशा पद्धतीने हे व्यवहार केले. एवढी मोठी रक्कम जमीन घेण्यासाठी कुठून आणली. याचा तपास करण्यासाठी आरोपीला जास्तीत जास्त पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी देखील सरकारी वकिलांनी केली. तर अशोक खरात नॉमिनी असलेले बरेच खाते विविध पतसंस्थांमध्ये सापडले आहे. बरेच व्यवहार झाले आहे, याचा देखील तपास करायचा आहे असं तपासी अधिकारी आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे, आता कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. 

तर भोंदू अशोक खरात न्यायाधीश यांच्यासमोर खाली मान घालून स्तब्ध उभा. तपासी अधिकारी निवांत जाधव यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की, गुन्हा गंभीर आहे. त्यामुळे आम्हाला आरोपीची चौकशी करायची आहे. जमीन खरेदी केली तेव्हा पैसे कुठून मिळाले. याचा तपास करायचा आहे. व्याजाचे पैसे कोणी कोणी वाटून घेतले. या गुन्ह्यातील दुसरी आरोपी अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात फरार आहे. तिच्याकडून देखील आणखी माहिती घ्यायची आहे. एकूण चौदा व्यवहार करण्यात आले. त्यात 5 कोटी 52 लाखांचे व्यवहार आहेत, फसवणूक केल्याचा उद्देश स्पष्ट होतो, कल्पना खरात ही त्याची पत्नी असल्याने ती कुठे राहू शकते याबाबत तपास करायचा आहे, खरातला जास्तीत जास्त पोलिस कोठडी दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

त्याचबरोबर यामध्ये आणखी यात काही लोक सहभागी आहेत का. याची देखील ह्या अशोक खरात याच्याकडून चौकशी करायची आहे. शिर्डी पोलिसांनी भोंदू खरात यासाठी कोर्टाकडे सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली आहे. न्यायाधीश यांच्यासमोर भोंदू खरात याला हजर केलं, शिर्डी पोलिसांच्या वतीने तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव युक्तिवाद करत आहेत,तर न्यायाधीश यांनी भोंदू खरात याला विचारलं काही सांगायचे आहे का? भोंदू खरात मान हलवत ''नाही'' म्हणाला .