जनतेसाठी शंभर गुन्हे अंगावर घ्यायला तयार - जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले

जनतेसाठी शंभर गुन्हे अंगावर घ्यायला तयार - जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमुळे त्रस्त झालेल्या जनतेसाठी जर शंभर गुन्हेही अंगावर घ्यावे लागले, तरी बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निष्ठावान शिवसैनिक या नात्याने मी मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी प्रसिद्धीपत्रकातून मांडली आहे.

प्रसिद्धीपत्रकात जिल्हाप्रमुख इंगवले म्हणतात, "शिवसेना या चार अक्षरांचा आणि शिवसैनिकांच्या अस्तित्वाचा मान राखणे, तसेच जनतेच्या हितासाठी लढणे, हे माझे कर्तव्य आहे. प्रशासकीय कायदे आणि धमक्यांनी मला दबावात आणता येणार नाही."

महापालिकेतील गैरव्यवस्था उघड करताना त्यांनी पुढे सांगितले की, "रस्त्यांवरील खराब दिवे, अस्वच्छता, ठेकेदारांनी रस्त्यांवर टाकलेला कचरा, ओसंडणाऱ्या गटारांची स्थिती आणि पार्किंगच्या अभावासारख्या गंभीर समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही लोकांच्या वतीने प्रशासकांची भेट घेतली. या आंदोलनात रिक्षाचालकही स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. मग यात गैर काय?" असा सवालही जिल्हाप्रमुख इंगवले यांनी उपस्थित केला.