जिजाऊ ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी स्मिता हातकर तर शहर उपाध्यक्षपदी रेवती पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी): मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेड, कोल्हापूरच्या वतीने संघटनेचा विस्तार करत नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी स्मिता तानाजी हातकर यांची, तर कोल्हापूर शहर उपाध्यक्षपदी रेवती प्रवीण पाटील यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेचे अधिकृत नियुक्ती पत्र जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष वनिताताई निंबाळकर आणि विभागीय कार्याध्यक्ष चारुशीला पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. या निवडीमुळे कोल्हापूर जिल्हा व शहरात जिजाऊ ब्रिगेडची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या महत्त्वाच्या निवड सोहळ्याप्रसंगी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अश्विनकुमार वागळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष स्मिता कोकाटे, जिल्हा सचिव सुमन वागळे, शहराध्यक्ष त्वरिता पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा समन्वयक सागर पाटील आणि शहराध्यक्ष निलेश चव्हाण यांचा समावेश होता. तसेच मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, तानाजी हातकर, विकास जाधव, संजय साळुंखे, अतुल पाटील यांच्यासह जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी नवनियुक्त उपाध्यक्षांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस व संघटनात्मक कार्यास शुभेच्छा दिल्या.




