कागलच्या शाहू कृषी खरेदी-विक्री सोसायटीची निवडणूक बिनविरोध
कागल (प्रतिनिधी) - श्री छत्रपती शाहू कृषी सहकारी खरेदी-विक्री सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक (२०२५-२०३०) सलग चौथ्यांदा बिनविरोध झाली. बहुराज्यीय कायद्यातंर्गत नोंदणी असलेल्या शाहू कृषी संघाची एकवीस जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कार्यालयात जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीसाठीची ही विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

निवडून द्यावयाच्या संचालकांच्या संख्येइतकेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे व कुणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी केंद्रीय निवडणूक विभागाकडे याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला. मान्यतेनंतर पदाधिकारी निवडी होऊन निवडणूक कार्यक्रम पुर्ण होईल. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव व चंद्रकांत इंगवले यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू ग्रुपअतंर्गत श्री छत्रपती शाहू साखर कारखाना,राजे विक्रमसिंह घाटगे बँकेनंतर नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ साधत शाहू कृषी संघाची निवडणूकसुद्धा बिनविरोध झाल्यामुळे सभासदांतून समाधान व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट दर्जाची खते,औषधे, बि-बियाणे, शेती साहित्य इत्यादीची योग्य वेळेत किफायतशीर दरात पुरवठा करणे, शेतकऱ्यांना सुधारीत तंत्रज्ञानाची खते व औषधे इ. वापराबाबत माहिती देणे. तसेच शाहू ग्रुपमधील संलग्न संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना मदत करणे. या उद्देशाने शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी या संघाची १९८३ साली स्थापना केली. महाराष्ट्र व कर्नाटकात संघाच्या एकूण बावीस शाखा शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहेत. याशिवाय कागलमध्ये कागल बाजार नावाचे अद्यावत डिपार्टमेंटल स्टोअरसुद्धा सुरू आहे. २००५ सालच्या निवडणुकीचा अपवाद वगळता स्थापनेपासून या संस्थेच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
बिनविरोध निवड झालेल्या संचालकांची नावे -
राजे समरजितसिंह घाटगे (शिंदेवाडी), पंकज पाटील (कोगनोळी), रामचंद्र वैराट (एकोंडी), दिनकर वाडकर (व्हनाळी), आण्णापा बोडके (द. वडगाव), सुदर्शन मजले (कसबा सांगाव), राजेंद्र नुल्ले (नानीबाई चिखली), शहाजी पाटील (लिंगनूर दू) प्रकाश देसाई (यमगे), जगदीश मोरे (वडगाव कापशी), चंद्रकांत दंडवते (गोरंबे) प्रवीण चौगुले (चिमगाव), तानाजी पाटील (बेलेवाडी का), दिगंबर अस्वले (मळगे बु), संदेश पाटील (बिद्री), रवींद्र मोरे (कणेरीवाडी), रमेश माने (कागल),अक्षय घस्ते (कागल),मालुबाई पाटील (बेलवळे खुर्द) जयश्री कोरवी (कागल),रमेश कांबळे (सिद्धनेर्ली).




