सोने - चांदी दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा दर किती..?

सोने - चांदी दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा दर किती..?

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळत होती. दररोज नवे उच्चांक गाठणाऱ्या या मौल्यवान धातूंना अखेर गुरुवारी ब्रेक लागला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली असून चांदी तब्बल २० हजार रुपयांनी कोसळली आहे. तर सोन्याच्या दरात सुमारे ४ हजार रुपयांची घट झाली आहे. चांदीच्या ५ मार्च एक्सपायरीच्या वायद्याचे दर बुधवारी ३ लाख २५ हजार ६०२ रुपयांवर पोहोचले होते. मात्र गुरुवारी त्यात १९ हजार ८४९ रुपयांची घसरण होऊन दर ३ लाख ५ हजार ७५३ रुपयांवर आले.

सोन्याच्या दरातही घसरण दिसून आली आहे. सोन्याचे दर ४ हजार ८५ रुपयांनी कमी होऊन १ लाख ४८ हजार ७७७ रुपयांवर पोहोचले. सोने-चांदीच्या दरातील या घसरणीमागे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँड आणि युरोपविषयक बदललेल्या धोरणाचा परिणाम असल्याचं बाजारात बोललं जात आहे.

सराफ बाजारातही दर घसरले असून चांदीचा दर १५ हजार ५१३ रुपयांनी कमी झाला आहे. जीएसटीसह चांदीचा दर ३ लाख १२ हजार ६९१ रुपये इतका आहे. दरम्यान, २४ कॅरेट सोन्याच्या दरात २ हजार ७२८ रुपयांची घसरण झाली असून जीएसटीसह एक तोळा सोन्याचा दर १ लाख ५६ हजार ४३ रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर २ हजार ४९९ रुपयांनी कमी होऊन १ लाख ३८ हजार ७७३ रुपयांवर आला आहे. जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार ९३६ रुपये आहे.