टीम इंडियासमोरच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीने मोठं संकट, आता OUT कोण in कोण ?

टीम इंडियासमोरच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीने मोठं संकट, आता OUT कोण in कोण ?

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीला अखेर भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या संघात या 15 वर्षीय युवा फलंदाजाची निवड करण्यात आली असून आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, वैभवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास कोणाला बाहेर बसावे लागणार?  

वैभव सूर्यवंशी हा सलामीवीर आहे. त्याने आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन त्याला मधल्या फळीत खेळवण्याचा धोका पत्करेल, अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याला सलामीलाच उतरवले जाऊ शकते.

सध्या भारतीय टी-20 संघात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही सलामीची जोडी आहे. अभिषेक शर्मा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दमदार कामगिरी करत असल्याने त्याची जागा धोक्यात असल्याचे दिसत नाही. त्यामुळे वैभवला संधी द्यायची झाल्यास सर्वात मोठा फटका संजू सॅमसनला बसू शकतो.

संजू सॅमसनला संघ व्यवस्थापन मधल्या फळीत खेळवण्याचा पर्याय नक्कीच उपलब्ध आहे. मात्र संघ संयोजन, विकेटकीपरची भूमिका आणि इतर फलंदाजांची उपस्थिती पाहता त्याला बाहेर बसवण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. विशेषतः जर संघाला भविष्यासाठी वैभवसारख्या युवा खेळाडूला जास्तीत जास्त सामने देण्याची इच्छा असेल तर संजूला काही सामने बाकावर बसावे लागू शकतात.