गौतम गंभीरने 'या' क्रिकेटपटूंना दिली लक्षवेधी टोपणनावे
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अलीकडील एका कार्यक्रमात आपल्या खास शैलीत काही प्रमुख भारतीय क्रिकेटपटूंना मजेशीर आणि लक्षवेधी टोपणनावे दिली आहेत. दिल्ली प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यादरम्यान बोलताना त्यांनी विराट कोहलीला 'देसी बॉय' असं नाव दिलं, आणि ते सोशल मीडियावर तुफान गाजू लागलं आहे.

गंभीर इथेच थांबले नाहीत. त्यांनी इतर खेळाडूंनाही हटके आणि प्रेरणादायक टोपणनावे दिली.
- सचिन तेंडुलकर – ‘क्लच’
- जसप्रीत बुमराह – ‘स्पीड’
- शुभमन गिल – ‘मोस्ट स्टायलिश’
- जहीर खान – ‘डेथ ओव्हर स्पेशलिस्ट’
- व्हीव्हीएस लक्ष्मण – ‘रन मशीन’
- ऋषभ पंत – ‘मोस्ट फनी’
- राहुल द्रविड – ‘मिस्टर कन्सिसटंट’
- नितीश राणा – ‘गोल्डन आर्म’
कार्यक्रमादरम्यान गंभीर म्हणाले की, सध्या ते क्रिकेटपासून थोडं दूर आहेत कारण भारतीय संघाला एक महिन्याची विश्रांती देण्यात आली आहे. दिल्ली प्रीमियर लीगचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, हा लीग दिल्लीतील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिध्द करण्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहे.
"दिल्लीमध्ये प्रतिभेची कमतरता नाही. येथील स्थानिक स्पर्धा अत्यंत चुरशीच्या असतात आणि भविष्यात भारतासाठी दर्जेदार खेळाडू याच मातीतील जन्म घेतील," असं मतही गंभीरने व्यक्त केलं.




