वनडे च्या सामन्यात हर्षित राणाला आयसीसीने का तंबी दिली..? ; नेमकं प्रकरण काय..?

वनडे च्या सामन्यात हर्षित राणाला आयसीसीने का तंबी दिली..? ; नेमकं प्रकरण काय..?

Cricket News - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांचा दुसरा वनडे रायपूरमध्ये सुरू आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1 - 0 ने आघाडीवर आहे. रांचीतील पहिल्या सामन्यात भारताने 17 धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा चमकला होता. पहिल्याच षटकात त्याने रायन रिकेल्टन आणि क्विंटन डी कॉक यांची महत्त्वाची विकेट घेत प्रभाव टाकला. मात्र एका आचारसंहिता उल्लंघनामुळे आयसीसीने त्याला तंबी देत एक डिमेरिट पॉइंटही दिला आहे.

https://x.com/nikun28/status/1996110868686536732?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1996110868686536732%7Ctwgr%5E3f9241d849229ad9b652a6c47b6957ec110ab78e%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Ficc-takes-action-harshit-rana-punishes-for-crossing-the-line-dewald-brevis-ind-vs-sa-odi-marathi-news-1402802

आयसीसीच्या माहितीनुसार, हर्षितने ‘खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या आचारसंहिते’ तील कलम 2.5 चे उल्लंघन केले. हे कलम अशा कृतींशी संबंधित आहे, ज्यामुळे आउट झालेल्या फलंदाजाचा अपमान होऊ शकतो किंवा त्याला चिडवले जाऊ शकते. गेल्या 24 महिन्यांत ही त्याची पहिली चूक असल्याने हर्षितने आपली चूक मान्य करत मॅच रिफरी रिची रिचर्डसन यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली.

रांचीतील पहिल्या सामन्यात ब्रेविसला आउट केल्यानंतर हर्षितने जोरदार सेलिब्रेशन केले. मागील ओव्हरमध्ये ब्रेविसने त्याच्यावर ‘नो-लुक’ षटकार ठोकला होता, त्याचाच बदला घेतल्यासारखे हर्षितचे सेलिब्रेशन दिसले. त्याने बोट दाखवत ब्रेविसला पॅव्हेलियनकडे जाण्याचा इशारा केला आणि एका व्हिडिओमध्ये तो शिवी देत असल्याचाही संशय निर्माण झाला. आयसीसीच्या मते ही कृती फलंदाजाला उचकवणारी ठरल्याने त्याच्यावर डिमेरिट पॉइंट नोंदवण्यात आला.