डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या केमिकल विभागातील ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट
कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागातील ५५ विद्यार्थ्यांना विविध १८ नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना वार्षिक ६.५० लाख रुपयांपर्यंतचे उच्चांकी पॅकेज मिळाले आहे.

मुंबईस्थित 'टेक्निमोंट आयसीबी प्रा. लि.' कंपनीत किरण ढेरे याची सर्वाधिक ६.५० लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली. तसेच नागपूरच्या 'सोलर ग्रुप लिमिटेड'मध्ये ६ विद्यार्थ्यांना ५.५० लाख रुपयांचे पॅकेज मिळाले. याशिवाय 'हार्मोनी ऑरगॅनिक्स, पुणे' येथे १२, तर 'प्लॅटेक्स इंडिया'मध्ये ८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यासह लक्ष्मी ऑरगॅनिक्स, बायोकॉन, एकर सोल्युशन्स आणि एम. जे. बायोफार्म यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्येही विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
संस्थेकडून दिले जाणारे उद्योगाभिमुख शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि सॉफ्ट स्किल्सच्या विशेष तयारीमुळेच हे यश मिळाल्याचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अधिष्ठाता प्रा. सुदर्शन सुतार, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे आणि विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.




