डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत; यंदाही १०० टक्के प्रवेश पूर्ण

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले की, वास्तुशास्त्र हे केवळ इमारतींच्या बांधकामापुरते मर्यादित नसून ती मानवी जीवनशैली, पर्यावरण आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधणारी व्यापक शाखा आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सर्जनशीलता आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करून भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. संजय एस. पवार यांनी मनोगतात सांगितले की, महाविद्यालयाचे हे यश म्हणजे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विद्यार्थी व पालकांनी दाखवलेला विश्वास आहे. विभागप्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांनी अभ्यासक्रमाची रचना, उपक्रम आणि विभागातील सुविधांची माहिती दिली. यानंतर नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध प्रयोगशाळा व सुविधांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय एस. पवार, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रवेश विभागप्रमुख आर. जी. बेन्नी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रवेश समन्वयक प्रा. तिलोत्तमा पाडळे आणि प्रा. मनजीत जाधव यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.




