डोंगराळेतील 'त्या' घटनेचा सोनार एकता फाउंडेशनने केला निषेध
कोल्हापूर (प्रतिनिधी) - मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सुवर्णकार समाजातील जगदीश दुसाने यांची लहानगी कन्या यज्ञा दुसाने हिच्यावर एका इसमाने चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सोनार एकता फाउंडेशनच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

कोल्हापूरातील सुवर्णकार बांधव आणि सोनार एकता फाउंडेशन यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. पोलीसांनी २४ वर्षीय इसमाला शिताफीने अटक केली असून, या प्रकरणी जलद गतीने न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा व या प्रकरणातील इसमाला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल पोतदार (हुपरीकर), उपाध्यक्ष अनिष पोतदार, सचिव नचिकेत भुर्के, खजिनदार रामदास रेवणकर, प्रकाश कबुरे, नंदू बेलवलकर, शिवनाथ पावसकर, राजेश आसगांवकर, सतीश शिरवर्टकर, सतीश पोतदार, संदीप कारेकर, सतीश मालंडकर, उदय देवरुखकर, सुनील पोतदार, मिलिंद जामसांडेकर, कपिल पोतदार, गौरव पोतदार व इतर सोनार बांधव उपस्थित होते.




