प्रशासकीय संकुलावरून तमिळनाडूचे राजकारण तापले; डाव्या पक्षांचा इशारा, टीव्हीके पक्षाकडून स्पष्टीकरण"

प्रशासकीय संकुलावरून तमिळनाडूचे राजकारण तापले; डाव्या पक्षांचा इशारा, टीव्हीके पक्षाकडून स्पष्टीकरण"

चेन्नई : चेन्नईच्या पट्टिनापक्कम येथे नवीन प्रशासकीय इमारत आणि संकुल उभारण्याच्या प्रस्तावावरून तमिळनाडूतील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकल्पाला स्थानिक मच्छिमार समुदाय, विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी आघाडीतील डाव्या पक्षांनी (CPI-M) तीव्र विरोध दर्शवला आहे.

 

सीपीआय(एम) पक्षाचे राज्य सचिव पी. षणमुगम यांनी या प्रकल्पावर जोरदार आक्षेप घेतला आहे. तमिळनाडू सरकारने कोणताही निर्णय लोकशाही पद्धतीने घेतला पाहिजे, अन्यथा सरकारला दिलेल्या पाठिंब्याबाबत फेरविचार करावा लागेल, असा इशारा डाव्या पक्षांनी दिला आहे.

दरम्यान, या संपूर्ण वादावर 'तमिळगा वेत्री कळगम' (TVK) पक्षाचे नेते आधव अर्जुन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांकडून या विषयावर अनावश्यक राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आधव अर्जुन यांनी सांगितले की, "या प्रकल्पाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. प्रशासनाकडून फक्त विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल."

बाधित होणाऱ्या मच्छिमारांना आश्वस्त करताना ते म्हणाले, "कोणालाही त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. या प्रकल्पामुळे कोणाचा आक्षेप आहे का, याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांनी चिंता करण्याची गरज नाही."