बिल्डर गुरु चिचकरांनी उचलले टोकाचे पाऊल

मुंबई - बांधकाम व्यावसायिक गुरु चिचकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. चिचकर हे नवी मुंबईतील प्रख्यात बिल्डर असून त्यांनी आपल्या राहत्या घरातच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. गुरु हे भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकर यांचे वडील आहेत. मुलावर दाखल केसेसच्या प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून चिचकरांनी आयुष्य संपवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. चिचकरांच्या मुलावर नार्कोटिक्स विभागाकडून अनेक केसेस दाखल आहेत. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं चिचकरांनी त्या सुसाईड नोट मध्ये लिहिलं आहे. नवीन चिचकर सध्या देश सोडून पळून गेले आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.