महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मागणी अर्जास प्रारंभ

महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मागणी अर्जास प्रारंभ

 कोल्हापूर (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्या टॉवर या ठिकाणी नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाकडे इच्छुकांचा कल पाहता 17 डिसेंबर पासून फॉर्म भरून घेणे विषयी सूचना देण्यात आल्या. फॉर्म भरून घेणे व इतर कायदेशीर गोष्टीची जबाबदारी सर्वश्री गणेश जाधव व ॲड. अनिल घाटगे यांच्यावर सोपवण्याचे ठरले त्या अनुषंगाने  17 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान सकाळी 10 ते सायं.5 या वेळेत शिवाजी स्टेडियम गाळा नंबर 1, राष्ट्रवादी कार्यालय या ठिकाणी पक्षाच्यावतीने उमेदवारी मागणारे अर्ज प्रदेश कार्यालयाकडून उपलब्ध झाले असून ज्या ज्या उमेदवारांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उभारावयाचे आहे. त्यांनी सदरचे फॉर्म 5 दिवसात भरून देणे विषयी आव्हान शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी केले आहे.

आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा समावेश आहे. तरी कोल्हापुरातील इच्छुक कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागणी फॉर्म भरून देऊन सहकार्य करावे. छापील फॉर्म कार्यालयात ठेवण्यात आले आहेत याची कृपया नोंद घ्यावी असे आवाहन कोल्हापूर उत्तर विधानसभा अध्यक्ष गणेश जाधव यांनी केले आहे. 

यावेळी शहराध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, महिला अध्यक्ष पद्मजा तिवले, उत्तर अध्यक्ष गणेश जाधव, प्रदेश प्रतिनिधी निरंजन कदम, इत्यादी उपस्थित होते.