रामसिना ग्रुपच्या "लोकनगरी" वास्तु प्रकल्पाचा रविवारी भूमिपूजन शुभारंभ - सचिन ओसवाल
कोल्हापूर (प्रतिनिधी):शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रात विश्वासार्ह नाव म्हणून ओळख असलेल्या रामसिना ग्रुप तर्फे “लोकनगरी” या नव्या निवासी प्रकल्पाचा भव्य शुभारंभ करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ रविवारी २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कारंडे मळा,पूण्य पर्व टाउनशिप , ऍपल सरस्वती हॉस्पिटल जवळ, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती रामसीना ग्रुपचे अध्यक्ष्य सचिन ओसवाल यांनी दिली.

रामसिना ग्रुपने यापूर्वी नागाळा पार्क परिसरात “लोकनगरी” हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, त्या प्रकल्पाला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. उत्कृष्ट नियोजन, दर्जेदार सुविधा आणि विश्वासार्हता यामुळे या प्रकल्पाला मोठी मागणी निर्माण झाली होती. याच यशाच्या बळावर आता नव्या ठिकाणी “लोकनगरी” हा प्रकल्प अधिक व्यापक स्वरूपात साकारण्यात येत आहे.
सदर नवीन प्रकल्पामध्ये सुमारे २५० प्लॉट्स तसेच १० पेक्षा अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियोजनबद्ध रस्ते, हरित परिसर, सुरक्षितता, पाणी व वीज यांसारख्या मूलभूत सुविधा तसेच आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयींचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला आहे.या भूमिपूजन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम, शिवसेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक (शहर-ग्रामीण) त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे .
प्रशस्त घर , प्राइम लोकेशन, परवडणारा दर, ह्या संकल्पनेवर आधारित “लोकनगरी” प्रकल्प हा नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात, दर्जेदार आणि नियोजनबद्ध घराचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. शहराच्या वाढत्या विस्तारासोबतच गुंतवणुकीसाठीही हा प्रकल्प एक उत्तम संधी ठरणार आहे.रामसिना ग्रुपने नेहमीच ग्राहकांचा विश्वास जपण्यास प्राधान्य दिले असून, पारदर्शक व्यवहार, वेळेत प्रकल्प पूर्ण करणे आणि गुणवत्तेची हमी ही त्यांची ओळख राहिली आहे. त्यामुळेच या नव्या “लोकनगरी” प्रकल्पालाही ग्राहकांकडून मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या शुभारंभ सोहळ्यास रामसीना ग्रुपचे अध्यक्ष्य सचिन ओसवाल , विकेश ओसवाल, यांनी रामसीना ग्रुपच्या वतीने ग्राहक आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.




