विद्यापीठ विकास मंच व शिवाजी विद्यापीठ एम फिल आघाडी यांच्या वतीने नाम. चंद्रकांत पाटील यांचा सत्कार

विद्यापीठ विकास मंच व शिवाजी विद्यापीठ एम फिल आघाडी यांच्या वतीने नाम. चंद्रकांत पाटील यांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - विद्यापीठ विकास मंच व शिवाजी विद्यापीठ एम फिल आघाडी यांच्या वतीने गेली 32 वर्ष एम फिल धारकांचा प्रलंबित प्रश्न सोडवल्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता सोहळा व सत्कार समारंभ हॉटेल रेडियंट या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ विकास मंचचे प्रदेश अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील  डी .आर .मोरे, डॉ. धमकले व निमंत्रक ॲड. स्वागत परुळेकर यांच्या हस्ते नाम.चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रस्ताविकामध्ये एम फिल बाबतच्या या प्रश्नाची वाटचाल आणि मान दादांच्या माध्यमातून झालेली सोडवणूक याबाबतची माहिती डॉ. धमकले यांनी दिली.

प्रा. एन. डी पाटील यांनी विद्यापीठ विकास मंच ही नेहमी एम फिल प्रश्नाबाबत प्राध्यापकांच्या सोबत राहिलेली आहे असे मत व्यक्त केले.

सत्कार समारंभाला उत्तर देताना नाम. चंद्रकांत म्हणाले की, एम फिल धारकांचा  गेले अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान व यूजीसी सेक्रेटरी मनीष जोशी यांचेसोबत सोबत वारंवार चर्चा करून महाराष्ट्र शासन व या खात्याचा मंत्री म्हणून मी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली. एम फील अहर्ताधारकप्राध्यापकाना सेवा कायम होतानाच वेतन व उच्च पद लाभही मिळणार आहे.भविष्यात देखील कोणत्याही स्वरूपाची अडचण एम.फील अहर्ता धारक प्राध्यापकांना येऊ देणार नाही याची ग्वाही आज देत आहे, काही प्रलंबित प्रश्नाबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठपुरावा करतानाच राज्य शासन स्तरावरही या एम फील धारक प्राध्यापकांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.सहाय्यक प्राध्यापक  व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीबाबत कार्यवाही सुरु असून देखील लवकरच ती प्रक्रिया सुरु होईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.