पानीपत (हरियाणा) येथील दीपक शर्मा यांचे शिवतीर्थावर हिंदुत्वनिष्ठांकडून स्वागत !

पानीपत (हरियाणा) येथील दीपक शर्मा यांचे शिवतीर्थावर हिंदुत्वनिष्ठांकडून स्वागत !

कोल्हापूर (प्रतिनिधी) - पानीपत (हरियाणा) येथील दीपक शर्मा हे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची कामगिरी जनतेत पोचवणे, ‘ऑपरेशन’ सिंधूरची यशस्वीता लोकांना सांगणे, तसेच ‘चार धाम यात्रा संकल्प’ घेऊन देशभरात सायकलवरून यात्रा करत आहेत. या प्रवासात ते कोल्हापूर येथे आले असता शिवतीर्थ (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथे हिंदुत्वनिष्ठांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.  तसेच त्यांना पुढील वाटचालासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर, जिल्हाउपाध्यक्ष विकास जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष  गजानन तोडकर, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे निरंजन शिंदे, प्रकाश घाटगे, भाजप उद्योग आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष नचिकेत भुरके, अजय सोनवणे, प्रदीप पाटील, अनिरुद्ध कोल्हापुरे, उद्योजक  प्रसन्न शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे महेंद्र अहिरे आणि आदित्य शास्त्री यांसह आदी उपस्थित होते.