राष्ट्रवादीच विलीनीकरण हीच अजितदादांना श्रद्धांजली ठरेल-शशिकांत शिंदे
बारामती (प्रतिनिधी): साप्ताहिकेतील या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी याबाबत अनेक दावे केले होते. यासाठी बैठकाही झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकात मोठा दावा केला आहे.

"विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल",असंही शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकामध्ये म्हटले आहे.




