लेखा कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्षपदी संजय शिंदे यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, लेखा कर्मचारी संघटना पी. एन. १४२५ जिल्हा शाखा कोल्हापूरच्या अध्यक्षपदी संजय श्रीपतराव शिंदे यांची निवड केली आहे. संघटनेची वार्षिक सभा जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात पार पडली. त्यावेळेस ही निवड करण्यात आली.
शिंदे जि.प. मुख्यालयात कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत. सहसचिवपदी अभय भोसले, प्रमुख सल्लागार म्हणून प्रदीप सकटे, सचिन कोळी यांची, महिला प्रतिनिधीपदी यशोमती गायकवाड आणि समीक्षा पाटील यांची निवड केली.