लोकप्रतिनिधी व राष्ट्रपतींची मुले एकाच शाळेत जातील त्यावेळी भारत बलशाली होईल- खा.धैर्यशील माने

लोकप्रतिनिधी व राष्ट्रपतींची मुले एकाच शाळेत जातील त्यावेळी भारत बलशाली होईल- खा.धैर्यशील माने

कोल्हापूर (प्रतिनिधी): देशातील लोकप्रतिनिधी व राष्ट्रपतींची मुले सर्वसामान्यांच्या मुलांबरोबर एकाच शाळेत जातील त्यावेळी भारत बलशाली होईल, असे उद्गार खासदार धैर्यशील यांनी काढले ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित  पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले शिक्षकांच्या टीईटी परीक्षेबद्दल मी संसदेत आवाज उठवला असून माझ्यासह 125 खासदारांनी हा विषय उचलून धरला आहे याबाबत नक्कीच चांगला मार्ग काढला जाईल आणि लवकरच खासदारांचे एक शिष्टमंडळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. 2011 पूर्वीच्या शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याची गरज नसताना न्यायालयाच्या एका निर्णयाने देशातील शिक्षक वर्ग हवालदिल झाला आहे याबाबत मी नक्की प्रयत्न करणार आहे.

 जय पॅलेस कळंबा येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी केले तर स्वागत महिला जिल्हाध्यक्ष संगीता अस्वल यांनी केले.

     यावेळी आमदार जयंत आसगावकर म्हणाले,"समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाचे योगदान मोठे असून अशैक्षणिक कामामुळे त्याचे मुख्य शिकवण्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे संच मान्यता टीईटी यासारखे प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहेत याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच मार्ग काढू.

    जिल्हा परिषद कोल्हापूरच्या शिक्षण सभापती शितल प्रवीण यादव यावेळी उपस्थित होत्या. माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव म्हणाले,"शासनाचा प्राथमिक शिक्षकांवर विश्वास असून अनेक कामे शासन करून घेत आहे. अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत आणि शाळांना भौतिक सुविधा पुरविण्याबाबत मी विशेष प्रयत्न करणार आहे.शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर  म्हणाले, शिक्षकाचे मुख्य काम विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे असून अशैक्षणिक कामामुळे शिक्षकाला पुरेसा वेळ देता येत नाही.

     यावेळी शिक्षक समितीचे पुणे विभागाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख हरिदास वर्णे यांनी संपादित केलेल्या लढा या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. लढा स्मरणिकेत गेल्या तीन वर्षातील संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. 

     यावेळी  ज्योतीराम पाटील,कृष्णात कारंडे,प्रभाकर कमळकर, वर्षा केनवडे, अर्जुन पाटील, राजेंद्र पाटील, शिवाजी बोलके, सुरेश कोळी, रामदास झेंडे, बाबुराव परीट, सुनील कुंभार, सुनील शिंदे, शुभांगी माळी, दिलीप चौगले, संतोष पाटील, संजय बरगे, सुधाकर सावंत उमेश देसाई मारुती पाटील,विनायक मगदूम, सदानंदाचा यादव सुभाष विभुते, राजेश सोनपराते, दादा जांभवडेकर आदी आधी उपस्थित होते.  सूत्रसंचालन संजय जितकर,  बाबा धुमाळ, राजेंद्र तौंदकर केले.