शक्तिपीठ महामार्ग अलाइनमेंट बदल नको संपूर्ण महामार्ग रद्द करा

शक्तिपीठ महामार्ग अलाइनमेंट बदल नको संपूर्ण महामार्ग रद्द करा

चंदगड (प्रतिनिधी): अलाइनमेंट बदलून रस्ता लादत असलेल्या सरकारने गरज नसलेला शक्तिपीठ रद्द केलाच पाहिजे त्यासाठी आमचा लढा कायम राहील असा निर्धार आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. ते आजऱ्यातील शिवाजी सावंत सभागृहात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं  संभावित नवीन अलाइनमेंट मधील गावातल्या  शेतकऱ्यांच्या आयोजित मेळाव्यात बोलत होते. 

यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी  " या महामार्गामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला. मूठभर ठेकेदारांना आणि समर्थन करणाऱ्या सरकारमधील आमदारांना  फायदा करून देण्यासाठी  हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी  मारला जातोय. शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचं सरकारनं सिद्ध करून दाखवावं असं आव्हान शेट्टी यांनी दिलं.  

     माजी आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मध्ये जैवविविधता, पर्यावरण यांना हानी पोहोचून जंगली प्राणी शेतकऱ्यांच्या शिवारात आणि  घरात शिरतील अशी भीती व्यक्त केली .या महामार्गाचा अट्टाहास हे स्थानिक आमदाराचे अज्ञान दर्शवतं अशी टीकाही त्यांनी  केली. गिरीश फोंडे यांनी भोंदू बाबा अशोक खरातन शक्तिपीठ महामार्गात जमीन खरेदी केली असल्याचं सांगून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली.

      यावेळी चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक ,जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई ,तानाजी देसाई, सुनील शिंत्रे, संजय तरडीकर, राजेंद्र गड्ड्यांवर, युवराज जाधव, मुकुंद देसाई, सम्राट मोरे, यांचीही  भाषणं  झाली. यावेळी गट नंबर आल्यानंतर जिल्हा आणि तालुकावार मेळावे घेत हळूहळू आंदोलन तीव्र करण्याचा ठराव सर्व संमत करण्यात आला.

      यावेळी गोकुळ संचालक प्रकाश पाटील, अरविंद देसाई, संदीप देसाई ,अंजनाताई रेडेकर, अभिषेक शिंपी, रवींद्र बाटले, प्रकाश मोरुजकर ,कृष्णा भारतीय ,निवृत्ती कांबळे,अभिजीत शिंपी, संजय सावंत, अशोक तरडेकर, संजय तरडेकर, सचिन घोरपडे, सर्जेराव देसाई, तानाजी देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.