शिरोली दुमाला कुस्ती मैदानात पार्थ कळंत्रे, पृथ्वीराज सलगर विजेते
करवीर (प्रतिनिधी): शिरोली दुमाला (ता.करवीर)येथील शेख फरदिन बाबा उरसानिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या दोन कुस्त्यामध्ये पार्थ कळंत्रे ( बाचणी ) व पृथ्वीराज सलगर ( तळंदगे ) हे विजयी झाले. विजेत्या पैलवानांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

पार्थ कळंत्रे याने राजवर्धन पाटील ( पाडळी ) याच्या वर कांही क्षणात पोकळ घिस्सा डावावर मात केली. तर पृथ्वीराज सलगर याने भरत चव्हाण ( मुंडे तालीम ) याच्यावर अटीतटीच्या लढतीत घुटना डावावर चितपट केले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत जयवर्धन पाटील ( शिरोली दुमाला ) याने संस्कार तोरस्कर ( सांगली ) याला घुटना डावावर चितपट केले. जयवर्धनवर बक्षीसांचा वर्षाव झाला.
तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत ओंकार पाटील ( द्रोणागिरी ) याने समर्थ पाटील ( वडणगे ) यांच्यावर डंकी डावावर मात केली. यावेळी ६० हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. यावेळी कुस्ती शौकीणांनी मोठी गर्दी केली होती. विजेत्या मल्लाना गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील, उपसरपंच कृष्णात पाटील, राहुल पाटील, सुनिल पाटील, सुशांत पाटील, शिवाजी कांबळे, दीपक कांबळे, भीमराव कराळे, एम. एस. पाटील, संजय पाटील, मानसिग पाटील,तानाजी पाटील, आदी उपस्थित होते. दिपक वरपे यांनी उत्कृष्ट निवेदन केले.




