सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नवा ट्विस्ट? संचिताचं नाव चर्चेत, इंस्टाग्राम अकाउंटचीही माहिती समोर

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नवा ट्विस्ट? संचिताचं नाव चर्चेत, इंस्टाग्राम अकाउंटचीही माहिती समोर

मुंबई (प्रतिनिधी) : 30 वर्षीय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता मच्छिंद्र उगले हिनं आत्महत्या केली आणि होत्याचं नव्हतं झालं. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिच्या चुलत भावाने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीचा चुलत भाऊ आकाश उगले यानं आपल्या बहिणीच्या आत्महत्येचा संबंध दिवंगत अभिनेता  सुशांत सिंह राजपूत  याच्या आत्महत्येशी जोडला आहे. संचिता उगलेचा चुलत भाऊ आकाश उगले नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात.

अभिनेत्री संचिताचा चुलत भाऊ आकाश उगलेनं अमर उजालासोबत बोलताना सांगितलं  की, 'तिच्यावर इंडस्ट्रीतील बड्या लोकांकडून कोणताही दबाव नव्हता. माझ्या बहिणीची इन्स्टाग्रामवर आणखी एक आईडी आहे. तिच्या या आईडीमध्ये तिनं सुशांत सिंह राजपूतचे काही व्हिडीओ शेअर केले होते.  तिनं एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं 'इट्स अगेन 14 जून', असं म्हटलं होतं. सुशांत सिंह राजपूतनं 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती.  

संचिता उगलेनं देखील 14 जून 2026 रोजी आत्महत्या केली आहे. सामान्य घरातून आलेल्या मुलांना साधारण इंडस्ट्रीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो', असं आकाश उगले म्हणाला. यावेळी तिचा भाऊ भावुक झाला असल्याचं पाहायला मिळाला.  दरम्यान, संचिता उगले या टीव्ही अभिनेत्रीनं नेमकी आत्महत्या का केली? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.