विधानभवनात रंगला अनपेक्षित क्षण! नितेश राणेंची आदित्य ठाकरेंना मिश्किल टिप्पणी, दोघेही हसले
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार सामना सुरू असतानाच विधानभवन परिसरात एक वेगळाच राजकीय क्षण पाहायला मिळाला. कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यातील हलक्या-फुलक्या संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विधानभवन परिसरात पत्रकार आणि कॅमेऱ्यांची मोठी गर्दी असताना आदित्य ठाकरे सभागृहाकडे जात होते. त्यावेळी जवळच उभे असलेल्या नितेश राणेंनी मिश्किल अंदाजात आदित्य ठाकरेंना म्हटले, **"तुमच्या आणि माझ्यासाठीच ते थांबले आहेत!"यावेळी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर हलकेच हात ठेवत संवाद साधला. या अनपेक्षित क्षणानंतर दोन्ही नेते हसत आपल्या कामासाठी पुढे निघून गेले.
राजकीय व्यासपीठावर एकमेकांवर सातत्याने टीका करणारे हे दोन्ही युवा नेते विधानभवनात मात्र मैत्रीपूर्ण वातावरणात दिसल्याने उपस्थितांमध्येही चर्चा रंगली. या भेटीचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू आहे.




