बी-ग्रेड चित्रपटांची शूटिंग नेमकी कशी होते?
मुंबई (प्रतिनिधी) : मनोरंजनाच्या दुनियेत बी-ग्रेड चित्रपट आणि त्यातील इंटीमेट सीन्सबाबत कायमच चर्चा होत असते. बॉलिवूडमधील काही मोठ्या कलाकारांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला किंवा लो-फेजमध्ये बी-ग्रेड किंवा कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हे चित्रपट नेहमी “अश्लील” नसतात, पण कमी बजेट, मर्यादित रिलीज आणि बी-ग्रेड टॅगमुळे ओळखले जातात. पडद्यावर कलाकारांना बोल्ड किंवा रोमँटिक सीन करताना पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे सीन प्रत्यक्षात कसे शूट केले जातात. चला, जाणून घेऊया बी-ग्रेड चित्रपट काय असतात आणि त्यांची शूटिंग कशी केली जाते.

बी-ग्रेड चित्रपट म्हणजे कमी बजेटमध्ये तयार केलेले व्यावसायिक चित्रपट. यामध्ये सहसा मोठे किंवा प्रसिद्ध कलाकार नसतात. कथानकापेक्षा अशा चित्रपटांमध्ये बोल्ड, हिंसक किंवा भयपट प्रकारच्या दृश्यांना अधिक महत्त्व दिले जाते.
हे चित्रपट साधारणपणे 70 ते 80 मिनिटांचे असतात आणि मुख्यतः प्रौढ म्हणजेच (18+) प्रेक्षकांना लक्षात घेऊन बनवले जातात. कमी बजेटमुळे या चित्रपटांची तांत्रिक गुणवत्ता आणि प्रोडक्शन व्हॅल्यू मर्यादित असते. प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी पोस्टर आणि नावही आकर्षक किंवा भडक ठेवले जातात. हे चित्रपट प्रामुख्याने लहान शहरांतील थिएटर्समध्ये प्रदर्शित होतात.
या चित्रपटांसाठी प्रामुख्याने नवोदित कलाकार, मॉडेल्स किंवा टीव्ही कलाकारांची निवड केली जाते. बोल्ड सीनसाठी अनेकदा अभिनेत्रीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते.शूटिंग सहसा स्वस्त हॉटेल्स, गेस्टहाऊस किंवा फार्महाऊसमध्ये केली जाते. आउटडोअरपेक्षा इंडोअर शूटिंगला अधिक प्राधान्य दिले जाते. शूटिंगचे वेळापत्रकही खूपदा ताणाचे असते.अनेकदा 18 ते20 तासांच्या शिफ्ट्समध्ये काम केले जाते आणि कमी वेळात चित्रपट पूर्ण केला जातो.
इंटीमेट सीन शूट करताना सेटवर फक्त आवश्यक तेवढेच क्रू मेंबर्स उपस्थित असतात. यात कॅमेरामन आणि काही तांत्रिक कर्मचारी हजर असतात. बजेट कमी असल्यामुळे टीमही लहान असते.अनेक अभिनेत्रींच्या मते, काही वेळा आर्थिक गरजेमुळे त्यांनी अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पूर्वी अश्लील किंवा बोल्ड कंटेंट फक्त बी-ग्रेड चित्रपटांपुरता मर्यादित होता. मात्र आता काळ बदलला आहे. टीव्ही, ओटीटी आणि मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्येही इंटीमेट सीन दाखवले जातात. आजकाल अशा सीनसाठी कलाकारांना आधी ट्रेनिंग दिलं जातं आणि शूटिंगदरम्यान इंटीमेट कोऑर्डिनेटरची मदत घेतली जाते, ज्यामुळे सीन सुरक्षित आणि प्रोफेशनल पद्धतीने शूट होतात.




