सूर्यकुमारचा 'धुरंधर' अंदाज, भर मंचावर केलं असं काही की, सर्वांना रहमान डकैत आठवला

सूर्यकुमारचा 'धुरंधर' अंदाज, भर मंचावर केलं असं काही की, सर्वांना रहमान डकैत आठवला

मुंबई (प्रतिनिधी) : धुरंधर' आणि 'धुरंधर 2'ची क्रेझ इतकी आहे की, त्यापासून सेलिब्रिटीही स्वतःला दूर राहू शकलेले नाही. अशातच आता हीच क्रेझ थेट आयपीएलपर्यंत (IPL 2026) पोहोचलीय. मुंबई इंडियन्सचा (MI) धडाकेबाज सूर्यकुमार यादव सध्या पूर्णपणे 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2'च्या क्रेझमध्ये बुडाल्याचं दिसतंय. दिग्गज बॉलर बुमराची मुंबई इंडियन्सच्या संघात वापसी झालीय. त्यावेळी नीता अंबानी यांनी टीमशी बोलताना बुमराहचं स्वागत केलं, त्यावेळी 'धुरंधर 2'चा गाजलेला डायलॉग "घर की याद नही आई जस्सी.." हा बोलून सूर्यकुमारनं जसप्रीत बुमराहचं स्वागत केलं. आणखी एक सूर्यकुमार यादवचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय, ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलंय. 

मुंबई इंडियन्सनं एक व्हिडीओ शेअर केलाय, त्या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स देत 'धुरंधर' सिनेमात अक्षय खन्नानं रहमान डकैत म्हणून केलेली हुक स्टेप केलीय. गुरुवार, 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सनं त्यांच्या इंस्टाग्रामवर सूर्यकुमारचा हा व्हिडीओ शेअर केला, जो काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये IPL 2026 मधला मुंबई इंडियन्सचा 'दादा' सूर्यकुमार यादवचा एक रिलॅक्स्ड आणि वेगळा अंदाज पाहायला मिळतोय.

या कार्यक्रमात तो 'Fa9la' या गाण्यावरची हुक स्टेप करत अगदी फिल्मी स्टाईलमध्ये सूर्यकुमार यादवनं एन्ट्री घेतली. व्हिडीओमध्ये तो अक्षय खन्नाचा व्हायरल डान्स स्टेप्स रीक्रिएट करताना दिसतोय. मुंबई इंडियन्सनं हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "ही दादाची स्टाईल आहे, पूर्ण 'धुरंधर' मोड."