ठाकरेंच्या फुटीर खासदारांचं विमान मुंबईत पोहोचलं; कोण कोण दिसले?
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे ॲापरेशन टायगर यशस्वी झालं आहे.शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदार आज राजकीय अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. त्याआधी ठाकरेंचे फुटलेले 4 खासदार आता मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर आज दुपारी 1.30 वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले. यानंतर आपल्या खाजगी वाहनाने ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचा मुंबईतील निवासस्थान नंदनवनच्या दिशेने निघाले आहेत.

ओमराजे निंबाळकर धाराशीवमधून मुंबईच्या दिशेने पोहचतील. तर संजय दिना पाटील मुंबईतच असल्याने ते देखील थोड्याच वेळेत नंदनवन येथे पोहोचतील अशी माहिती आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: यावेळी उपस्थित राहणार आहेत.ठाकरेंच्या या 6 खासदारांचा आज सायंकाळी 4 वाजता शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार आहे.दरम्यान, मुंबई विमानतळावर दाखल होताच फुटीर खासदारांचं यावेळी शिवसैनिकांकडून स्वागत देखील करण्यात आलं.




