अकोटमध्ये युरियासाठी झुंबड, शेतकरी रात्रभर कृषी केंद्राबाहेर झोपले; पोलिस कमांडो तैनात
मुंबई (प्रतिनिधी) : अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरियासाठी अक्षरशः हाहाकार उडालाय. आज 10 जून सकाळी नऊनंतर अकोट मधील कृषी बाजारपेठ उघडलीय. या ठिकाणी लागलेल्या शेतकऱ्यांच्या रांगांना नियंत्रण करण्यासाठी थेट पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलाय. खरिपासाठी युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीपासूनच कृषी केंद्रान बाहेर मुक्काम ठोकलाय. युरिया मिळवण्यासाठी कृषी केंद्रान बाहेर शेतकऱ्यांनी अख्खी रात्र जागून काढलीय. आता दुकान उघडल्यानंतर शेतकऱ्यांची एकच झुंबड कृषी केंद्र बाहेर पाहायला मिळते. काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये वादही होताना दिसतेय. त्यामुळेच प्रशासनाने आता अकोट मधील कृषी केंद्रात बाहेर थेट पोलीस कमांडोंचा बंदोबस्त लावलाय.

राज्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायमच रांगा आहेत का? कधी स्वतःला 'बळीराजा' म्हणवणारा शेतकरी कर्जमाफीसाठी थंब देण्यासाठी रांगेत असतोय, तर कधी त्याला बियाणं घेण्यासाठी आणि खत घेण्यासाठी रांगेत उभं रहावं लागतंय. मोदी सरकारच्या 'डिजिटल इंडिया'तील सरकारी अनास्थेचा हा पंचनामा करणारा 'माझा चा 'ऑन दी स्पॉट' रिपोर्टमधून वास्तव समोर आलं आहे. अकोल्यात अकोला जिल्ह्यातील अकोटचं कृषी मार्केटमध्ये पहाटे 3 वाजल्यापासून रांगा बघायला मिळाल्या आहे. प्रत्येकाची लगबग होती ती स्वतःचा नंबर लावण्यासाठी. कारण, प्रत्येकाला आपल्या शेतातील खरीप हंगामासाठी युरिया हवा आहे. यासाठी नंबर लागणार की नाही?, यातून हे शेतकरी रात्रीपासूनच कृषी केंद्र बाहेर आपला नंबर लागण्यासाठी धडपडत आहेत.
दरम्यान, रात्री तीनच्या अंधारात सुरू झालेला खत मिळवण्यासाठीचा संघर्ष सकाळी झुंजूमुंजू झालं तरी सुरूच होता. जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच अकोटमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्याय. त्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांनाही पाचारण करावं लागलं होतं. मात्र जिल्हा प्रशासनाने यानंतरही कोणतीच खबरदारी न घेतल्याने आजही तीच परिस्थिती अकोटमध्ये दिसतीये. शेतकऱ्यांचा सरकार असणारा दावा करणाररं महायुती सरकार खरंच शेतकऱ्यांपती संवेदनशील आहे का?, हाच प्रश्न यातून निर्माण होतेय.
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरियासाठी कृषी केंद्राबाहेर शेतकऱ्यांना रात्र जगाहून काढावी लागलीय. 'एबीपी माझा'ने अकोटमधील हे भयान वास्तव महाराष्ट्रासमोर आणलेय. युरिया मिळावा यासाठी 75 वर्षाच्या वृद्ध शेतकऱ्यांपासून बारा वर्षाच्या शेतकऱ्यांच्या मुलांचा रांगीमध्ये समावेश आहेय. कृषी केंद्र बाहेर रात्र जागून काढावी लागली तरी तेथे व्यवस्था मात्र कोणतीही करण्यात आलेली नाहीय. रांगेत नंबर लावण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाद होतानाही दिसत आहेत.




