के.एस.ए.चे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून राज्यस्तरीय विजेता कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघास १ लाखाचे बक्षीस जाहीर

कोल्हापूर - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा 20 वर्षाखालील मुले फुटबॉल अजिंक्यपद लोणावळा येथे संपन्न झाली. ही स्पर्धा नव्याने सुरू केलेली आहे. प्रथमच नव्याने सुरू झालेल्या या स्पर्धेत नांदेड व बलाढ्य नागपूर मुंबई याचबरोबर रायगड या संघांना पराभूत करून विजेतेपद मिळवून कोल्हापूरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झळकावले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विजेता संघातील सर्व खेळाडू ऑफिशियल्स प्रशिक्षक या सर्वांचे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. मालोजीराजे छत्रपती यांनी या विजेतेपदाची विशेष नोंद घेऊन खेळाडूंना व प्रशिक्षकांना प्रोत्साहन म्हणून रोख रुपये १ लाखाचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. व सर्व खेळाडूंना व प्रशिक्षकांना भेटवस्तू म्हणून कास्को कंपनीचा फुटबॉल व स्टड शूज देण्यात आले.
संघाचे प्रशिक्षक रवींद्र शेळके, विश्वंभर मालेकर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. संघ शिबिर प्रशिक्षक रिची फर्नांडिस व निखिल कदम या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले. कोल्हापूर संघात गोलकीपर सोहम विनायक खामकर, विवेकसिंह विनोदसिंह पाटील व खेळाडू रेहान समीर मुजावर, सिद्धेश सूर्यकांत भाट, प्रतीक हेमंत गायकवाड, पार्थ बाबासाहेब मोहिते, साईराज महेश पाटील, संचित संतोष तेलंग, यशराज संजय खोत, सोहम सुनील निकम, प्रेम प्रकाश देसाई (कर्णधार), सोहम संदीप साळोखे, सिद्धार्थ अविनाश पाटोळे, देवराज अमर जाधव, सिद्धेश आनंद पंदारे, सत्तेन रमेश पाटील व सर्वेश संदीप वाडकर व जैद शेख या फुटबॉल खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
यावेळी के.एस.ए.चे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, असिस्टंट सेक्रेटरीअमर सासणे, ऑन.फायनान्स सेक्रेटरी नंदकुमार बामणे, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी व कार्यकारणी सदस्य नितीन जाधव, विश्वंभर मालेकर, दीपक घोडके, प्रदीप साळोखे उपस्थित होते.