संजीवनचा फुटबॉल संघ राष्ट्रीय स्तरावर अजिंक्य

संजीवनचा फुटबॉल संघ राष्ट्रीय स्तरावर अजिंक्य

पन्हाळा : पन्हाळा येथील संजीवन पब्लिक स्कूल ( सी. बी. एस. ई. ) या निवासी प्रशाले मधील खेळाडूंनी भोपाळ येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद मिळवून देशात प्रथम क्रमांकाने विजयी होण्याचा बहुमान प्राप्त केला. 

सी. बी. एस. ई. अंडर 14 क्लस्टर फुटबॉल मॅचेस करिता देशभरामधून तब्बल 24 संघ सहभागी झाले होते. सदर स्पर्धा प्रथम लीग व नंतर बाद पद्धतीने घेण्यात आल्या. दिल्ली पब्लिक स्कूल विरुद्ध 8-0, आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध 2-0, अपेक्स इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध 3-0, राजेंद्र अकॅडमी तामिळनाडू विरुद्ध 0-0 सामना बरोबरीचा झाला. उपांत्यपूर्व फेरीत मैदान पब्लिक स्कूल झारखंड विरुद्ध 3-0, सेमी फायनल मध्ये दालमिया विद्यामंदिर विरुद्ध 6-0 अशाप्रकारे सर्व साखळी सामन्यामध्ये  संजीवन ची विजयी घोडदौड अखंडपणे सुरू राहिली.  अंतिम सामना राजेंद्र अकॅडमी तामिळनाडू विरुद्ध खेळून तीन 3-0 ने जिंकून संजीवन चे फुटबॉलपटू राष्ट्रीय पातळीवर अजिंक्य झाले. संजीवनच्या  संघाची  स्कूल गेम्स  फेडरेशन ऑफ इंडिया  यांच्यामार्फत होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. 

संजीवन च्या फुटबॉल संघातील  खेळाडू विजयाचे शिल्पकार ठरले. या विजयी खेळाडूंना संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले,  सह-सचिव एन. आर. भोसले, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सौरभ प्रकाश  भोसले, संजीवन पब्लिक स्कूलचे प्राचार्य  बी. आर. बेलेकर यांचे प्रोत्साहन आणि क्रीडाशिक्षक जयंत कुलकर्णी, संदीप जाधव,  प्रकाश जाधोर, अमित साळोखे,आणि नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

संजीवन शिक्षण समूहाने कोल्हापूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्र राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रामध्ये उज्वल केल्याबद्दल राज्यभरातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवरां कडून संजीवनच्या क्रीडा विभागाचे अभिनंदन होत आहे. देशपातळी वर प्राप्त केलेल्या या विजया मुळे संजीवनच्या या सर्व यशस्वी खेळाडूंची भव्य मिरवणूक संजीवन प्रांगणामध्ये जल्लोषामध्ये काढण्यात आली. त्यामुळे या संजीवन ज्ञान प्रांगणामध्ये आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे.